पाचल/ तुषार पाचलकर: पाचल गट विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी (सा.) लिमिटेड पाचल आणि ‘गोकुळ’ दूध उत्पादक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी पूजनाच्या शुभमुहूर्तावर पाचल पंचक्रोशीतील दूध उत्पादकांना आनंदाची भेट देण्यात आली. सोसायटीने दूध उत्पादकांना थेट पाच टक्के बोनस जाहीर केला, ज्यामुळे सुमारे सत्तर हजार रुपयांचा बोनस उत्पादकांना वितरित करण्यात आला. बोनस रकमेसोबतच, प्रत्येक दूध उत्पादकाला दुधाची किटली आणि मिठाई देऊन त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संस्थेमार्फत एक महत्त्वाकांक्षी योजनाही जाहीर करण्यात आली. पाचल परिसरातील जास्तीत जास्त युवकांना दूध उत्पादनासाठी प्रेरित करून त्यांना सहकार्य करण्यात येणार आहे, जेणेकरून आपल्या गावातच रोजगार निर्मिती करता येईल. संस्थेच्या या निर्णयामुळे स्थानिक तरुणांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
बोनस वाटप आणि शुभेच्छा समारंभावेळी संस्थेचे पदाधिकारी आणि परिसरातील दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. राजेंद्र केशव सावंत, माजी चेअरमन श्री. राजन विठ्ठल लाबडे, संचालक सर्वश्री किशोर शिवराम नारकर, धोंडीराम कोलते, शांताराम साळवी, सचिव श्री. प्रशांत सुतार, दूध संकलन केंद्र प्रमुख श्री. गौतम जाधव आणि सेल्समन श्री. दत्तप्रसाद राज्यधक्ष उपस्थित होते.
यावेळी परिसरातील दूध उत्पादकांमध्ये श्री. अजित शिंदे, श्री. अजीम फकीर, श्री. दिलीप साळवी, श्री. अरुण तेलंग, श्री. मनीष कदम, श्री. श्रीकांत लिंगायत, श्री. हमीद नाईक, श्री. कैलास रबसे, श्री. दिलीप इंदुलकर, श्री. सुहास तेलंग, श्री. कुणाल धावडे, श्री. शांताराम धावडे, सौ. आयशा प्रभुलकर, श्री. धनंजय ताम्हणकर, श्री. राजेश राणे, श्री. संजय कदम, श्री. ऋषिकेश प्रभुदेसाई, श्री. यश साळवी, श्री. सुभाष काळे आणि श्री. तुकाराम चौगुले यांच्यासह अनेक मान्यवर व उत्पादक उपस्थित होते.
संस्थेच्या या उपक्रमाने दिवाळीच्या पर्वावर दूध उत्पादकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, संस्थेच्या माध्यमातून स्थानिक रोजगार निर्मितीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.