खेड : शहराजवळील उसरेवाडी येथे राहणाऱ्या डिंपल दीपक उसरे (वय २५) या तरुणीने आजारपणाला कंटाळून १४ ऑगस्ट रोजी दुपारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
डिंपलच्या डोक्यामध्ये गाठ होती. तिच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात औषधोपचार सुरू होते. मात्र ती सतत आजारी असल्यामुळे घरीच असायची. अखेर आजारपणाचा त्रास सहन न झाल्याने तिने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. याप्रकरणी खेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
खेड : आजाराला कंटाळून 25 वर्षीय तरुणीची आत्महत्या
