खेड: महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष माननीय रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक दिवा वंचितांसाठी’ या संकल्पनेतून राज्यातील आदिवासी व भटक्या विमुक्त बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच निर्णयानुसार, भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा आणि भाजपा खेड दक्षिण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दीपावली पाडव्याच्या शुभमुहूर्तावर खेड तालुक्यातील आंबडस पंचायत समिती गणातील धामणंद येथील निवाची वाडी येथील आदिवासी वस्तीत जाऊन ‘पालावरची दिवाळी’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी वंचितांच्या जीवनात दिवाळीचा आनंद फुलवण्याचा प्रयत्न भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला. जिल्हाध्यक्ष सतीशजी मोरे साहेब आणि खेड दक्षिण मंडळ अध्यक्ष विनोदजी चाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. वस्तीतील गरजू आदिवासी महिलांना साडी वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष नागेशजी धाडवे, जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, अध्यात्मिक जिल्हा संयोजक प्रमोद सकपाळ, खेड दक्षिण तालुका सरचिटणीस संदेश म्हापदी, सरपंच राजू वाघमारे, कल्पेश तांबे, बूथ अध्यक्ष प्रवीण उतेकर, प्रविण सुतार, उदय कदम, संजय पाडेकर, अनंत पालांडे तसेच मोठ्या संख्येने आदिवासी महिला आणि बांधव उपस्थित होते. ‘एक दिवा वंचितांसाठी’ या उपक्रमामुळे धामणंद निवाची वाडी येथील आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर दिवाळीचा खरा आनंद स्पष्टपणे दिसून आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरचिटणीस संदेश म्हापदी यांनी विशेष परिश्रम घेतले. भाजपाच्या या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले असून, उपस्थितांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.