GRAMIN SEARCH BANNER

दि. चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, चिपळूण शाखेची लांजा येथील स्थलांतरित शाखेचे आ. किरण सामंत यांच्या शुभहस्ते उद्घाटन*

Gramin Varta
21 Views

लांजा / प्रतिनिधी

दि. चिपळूण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, चिपळूण शाखेची लांजा येथील स्थलांतरित शाखेचे आमदार श्री. किरण सामंत यांच्या शुभहस्ते रविवारी उत्साहात उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच स्थानिक मान्यवर, व्यापारी वर्ग आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी आमदार किरण सामंत यांनी बँकेच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करत, ग्रामीण भागातील ग्राहकांना अधिकाधिक आर्थिक सेवा देण्याचे आवाहन केले. तसेच लांजा शाखेच्या माध्यमातून स्थानिक उद्योग, व्यापार आणि शेतकरी वर्गाला भक्कम आर्थिक पाठबळ मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगळ यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष रहमान दलवाई ,संचालक समीर जानवरकर,मुख्य कार्यकारी अधिकारी तुषार सूर्यवंशी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये,विकास माजळकर ,काका शिंदे ,बाबा लांजेकर, शिवाजी कोत्रे,राधिका पाथरे ,चंद्रकांत परवडी,सतीश खेडेकर ,राजू ग्कुरूप,मनोहर बाईत,यांच्यासह बँकेचे सर्व हितचिंतक शहरातील सर्व प्रतिष्ठित नागरिक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्घाटन सोहळा आनंदी आणि उत्साही वातावरणात पार पडला.

Total Visitor Counter

3379251
Share This Article