GRAMIN SEARCH BANNER

कोर्ले ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश साळुंके यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर

Gramin Varta
112 Views

लांजा : तालुक्यातील कोर्ले ग्रामपंचायतीचे कार्यतत्पर सरपंच गणेश साळुंके यांची यंदा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार २०२५ साठी निवड झाली आहे. या गौरवाने कोर्ले परिसरासह संपूर्ण लांजा तालुक्यातून साळुंके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरवर्षी सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “मान कर्तृत्वाचा… सन्मान नेतृत्वाचा” या उपक्रमांतर्गत ग्रामविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरपंचांचा गौरव केला जातो. यंदा या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी गणेश साळुंके यांची निवड करण्यात आली आहे.

गणेश साळुंके यांनी आत्मविश्वास, जिद्द आणि कार्यतत्परतेच्या बळावर कोर्ले ग्रामपंचायतीत विकासाचे अनेक उपक्रम राबवले आहेत. सामाजिक बांधिलकी, लोकसहभाग आणि पारदर्शक प्रशासन या तत्त्वांवर आधारित कामकाजामुळे कोर्ले ग्रामपंचायत आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख निर्माण करू शकली आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन गुरुवार, दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता माऊली संकुल सभागृह, सावेडी रोड, अहिल्यानगर येथे करण्यात आले आहे. या प्रसंगी शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, कालभक्त श्रीमहंत डॉ. श्रीकांतदास धुमाळ महाराज (उज्जैन), तसेच ग्रामसेवक नेते एकनाथर ढाकणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

गणेश साळुंके यांच्या या निवडीमुळे कोर्ले ग्रामपंचायत आणि लांजा तालुक्याचा गौरव वाढला असून, स्थानिक ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचा अभिमान व्यक्त केला आहे.

Total Visitor Counter

3297412
Share This Article