GRAMIN SEARCH BANNER

दक्षता जनजागृती सप्ताह रेल्वे स्टेशन, बाजारापेठ, एस टी स्थानकावर जनजागृती

Gramin Varta
97 Views

रत्नागिरी:- दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज रेल्वे स्टेशन, ग्रामीण पोलीस ठाणे, एसटी बस स्थानक, बाजारपेठ येथे जनजागृतीपर करण्यात आली.

पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी नागरिकांना जनजागृती सप्ताहाच्या अनुषंगाने नागरिकांना मार्गदर्शन केले तसेच १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार देण्यासंदर्भात आवाहन केले. रत्नागिरीच्या आकाशवाणी केंद्रावर पोलीस उप अधीक्षक पाटील यांनी जनतेला केलेली जनजागृतीपर माहिती प्रसारित करण्यात आली. यावेळी उपस्थितांना जनजागृती पर पत्रके व कार्डचे वाटप करण्यात आले, लाचलुचपत संदर्भात जनजागृती करण्यात आली पोस्टर लावण्यात आले.

कार्यक्रमात लाप्रवी युनिट चे पोलीस निरीक्षक मच्छींद्र जाधव, पोलीस निरीक्षक  श्री.रोकडे व स. फौ. श्री. चांदणे, पोलीस हवालदार श्री. नलावडे,  श्री. वाघाटे, श्री. पवार महिला पोलीस हवालदार श्रीमती विचारे, श्रीमती धनावडे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

Total Visitor Counter

3072836
Share This Article