GRAMIN SEARCH BANNER

गुहागर: गिरनार येथे देवदर्शनाला गेलेल्या तरुणाचा दुर्दैवीरित्या मृत्यू

Gramin Varta
542 Views

रत्नागिरी :  गुहागर शृंगारतळी येथील एका तरुण व्यापाऱ्याचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे गिरनार येथे देवदर्शनासाठी गेला असताना त्याचा विविध विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. प्रसाद उर्फ बाळा रविंद्र संसारे (वय ४६, मु.पो. जानवळे, ता. गुहागर) असे या मृत्यू झालेल्या तरुण व्यापाऱ्याचे नाव आहे.

प्रसाद हा एका एक गुहागर येथील एका ग्रुपबरोबर गिरनार येथे गेला होता. त्याचे गिरनार येथे जाणे हे अचानक ठरले होते. 

गिरनार (गुजरात) येथे देवदर्शनासाठी गेलेल्या या तरुण व्यापाऱ्याचा पायऱ्या चढताना जागीच कोसळून हृदयविकाराने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना शनिवारी स. ६ च्या सुमारास घडली. या घटनेने श्रृंगारतळी बाजारपेठेसह तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. गुहागर तालुक्यातील बहुसंख्य तरुण गिरनार येथे शुक्रवारी संध्याकाळी देवदर्शनासाठी गेले होते. श्रृंगारतळी बाजारपेठेतील प्रतिष्ठीत व्यापारी रविंद्र स्टोअर्सचे मालक प्रसाद उर्फ बाळा रविंद्र संसारे (वय ४६, मु.पो. जानवळे, ता. गुहागर) हा तरुणदेखील गिरनारला गेला होता. शनिवारी सकाळी ६०० पायऱ्या चढून झाल्यावर तो जागीच कोसळला आणि तेथेच त्याचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती त्याच्यासोबतच्या मित्रांनी श्रृंगारतळीत त्याच्या नातेवाईकांना कळवली. प्रसाद संसारे यांच्या अचानक मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रसाद हा उत्कृष्ट क्रिकेटपटू होता तो दररोज आवडीने क्रिकेटही खेळत असे. त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. त्याला नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या दुचाकी मॉडेल गाड्या चालवण्याची त्याची मोठी आवड होती. प्रसाद संसारे यांचा मृत्यू चटका लावणारा ठरला आहे.त्यांच्या निधनाने व्यापारी, मित्रपरिवार ,शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. त्याच्या पश्चात पत्नी,दोन मुल, आई-वडील एक भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.

Total Visitor Counter

3072990
Share This Article