GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर: आंबेड बुद्रुकचे सुपूत्र पोलीस अंमलदार पराग मोहिते यांचे निधन; सिंधुदुर्ग पोलीस दलावर शोककळा

saurabhsalvi26@gmail.com
1.9k Views

संगमेश्वर : तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथील रहिवासी आणि सध्या सिंधुदुर्ग पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार पराग प्रभाकर मोहिते (वय ३९) यांचे मुंबई येथील रुग्णालयात वैद्यकीय उपचारादरम्यान अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. पराग मोहिते हे २६ डिसेंबर २०१२ रोजी सिंधुदुर्ग पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदावर भरती झाले होते. २९ सप्टेंबर २०२० पासून ते कणकवली पोलीस ठाण्यात आपली सेवा बजावत होते. सध्या त्यांची नेमणूक कणकवली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खारेपाटण पोलीस दूरक्षेत्र येथे होती. अत्यंत मनमिळाऊ आणि सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारे एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून ते संपूर्ण परिसरात सुपरिचित होते. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलासह त्यांच्या मूळ गावी आंबेड बुद्रुक येथे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई व वडील असा परिवार आहे.

Total Visitor Counter

3483456
Share This Article