GRAMIN SEARCH BANNER

देवरुख : सप्तलिंगी नदीत बुडून पूर येथील तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
617 Views

पारोसे काढणे पडले महागात

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील पूर येथील तरुणाचा साप्तलिंगी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार 2 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. अजय अशोक कांबळे (35, पूर बौद्धवाडी, देवरुख) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबतची फिर्याद मयत अजय याच्या भावाने देवरुख पोलिसात दिली.

सविस्तर वृत्त असे की, अजय याची पत्नी सप्तलिंगी नदीवर रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेली होती. यावेळी अजयही त्या ठिकाणी गेला होता. त्याला नदीच्या पलीकडे पारोसे (भोपळ्याच्या आकाराचे फळ, भाजी करण्यासाठी वापरले जाते) त्याला दिसले. दरम्यान याचवेळी पत्नी घरी धुतलेले कपडे घरी ठेवण्यासाठी गेली होती. अजय याने ते फळ काढण्यासाठी नदी पोहून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला. दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला खोलवर पाणी असल्याने त्याला अंदाज आला नाही. आणि याच पाण्यात तो गटांगळ्या खावू लागला. नदीवर कपडे धुवत असलेल्या दुसऱ्या एका महिलेने ही घटना पाहिली आणि तिने आरडाओरडा केला. तिच्या आवाजाने अजय याची पत्नी धावत आली. ती आपल्या पतीला बुडताना पाहून हंबरडा फोडला. त्याला वाचवण्यासाठी दोघीही आरडाओरडा करत होते. गावातील काही नागरिक या ठिकाणी जमा झाले. गावातील ग्रामस्थ यांनी त्याचा पाण्यात शोध घेतला असता तो मिळुन आला नाही त्यानंतर खबर मयताचे वडील संतोष शिवराम कांबळे यांनी त्यांच्या ओळखीचे रमेश भागुराम सावंत व त्यांच्या पथकातील लोकांना त्या ठिकाणी बोलावुन त्यांनी देवरहाट सप्तलिंगी नदी या ठिकाणी येवुन नदिमध्ये उडी मारुन शोधुन बाहेर काढले. तेव्हा त्याची कोणतीही हलचाल होत नव्हती म्हणुन खबर देणार हे त्याला ग्रामिण रुग्णालय देवरुख येथे घेवुन आले. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासुन मयत घोषित केले. देवरुख पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याला 4 वर्षाचा मुलगा आहे. अजय याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सोमवारी सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ऐन दिवाळीत घटना घडल्याने कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Total Visitor Counter

3199472
Share This Article