GRAMIN SEARCH BANNER

पाली : मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शालेय स्वराज्य सभा निवड

Gramin Varta
48 Views

विद्यार्थ्यांच्या लोकशाही सहभागातून नवे पदाधिकारी निवडले

पाली (प्रतिनिधी) : मराठा मंदिर न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पाली येथे सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता शालेय स्वराज्य सभा (माध्यमिक विभाग) निवड पार पडली. विद्यार्थ्यांच्या लोकशाही सहभागातून विविध पदाधिकारी निवडून आले असून शालेय जीवनात नेतृत्वगुण जोपासण्यासाठी या सभेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

या वर्षी सभेच्या मुख्यमंत्रीपदी कुमारी आध्या राजेंद्र कृतडस्कर (दहावी अ) यांची निवड झाली. तसेच सांस्कृतिक मंत्रीपदी कुमारी आयेशा अजिज पेजे, क्रीडा मंत्रीपदी कुमार रितेश राजाराम सावंत, सहल मंत्रीपदी कुमार समर्थ दिलीप खानविलकर, शिस्त मंत्रीपदी कुमार यश रमाकांत गिडीये, आरोग्य मंत्रीपदी कुमार आर्यन विजय सावंत, पर्यावरण मंत्रीपदी कुमार श्रवण दीपक पवार, स्वच्छता मंत्रीपदी कुमारी श्रेया समीर शिगवण, ग्रंथालय मंत्रीपदी कुमारी मनस्वी शंकर नागले तर विद्यार्थीनी प्रतिनिधी म्हणून कुमारी श्रावणी दीपक पवार यांची निवड करण्यात आली.

या निवड प्रक्रियेमध्ये शालेय स्वराज्य सभेचे प्रमुख श्री. तुफिल पटेल यांनी मार्गदर्शन व संपूर्ण कामकाज पाहिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे निवड प्रक्रिया पारदर्शक व यशस्वीपणे पार पडली.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. कुशाबा करे, पर्यवेक्षिका सौ. नम्रता गोगटे, तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Total Visitor Counter

3369419
Share This Article