GRAMIN SEARCH BANNER

राजापूर नगर परिषद मुख्याधिकारी तुषार बाबर यांची पुणे महापालिकेच्या उपायुक्तपदी बदली

Gramin Varta
149 Views

जयंत जावडेकर राजापूर नगर परिषदेचे नवे मुख्याधिकारी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा नगर पालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त आणि राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांची पदोन्नतीवर पुणे महानगर पालिकेच्या उपायुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या रिक्त पदावर कोल्हापूर महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तुषार बाबर यांनी रत्नागिरी, लांजा आणि राजापूर नगर परिषदा अशा तिन्ही ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. तसेच ते रत्नागिरी जिल्हा नगर पालिका प्रशासनाचे जिल्हा सहआयुक्त म्हणूनही कार्यरत होते. प्रशासकीय कामकाजातील परिपूर्ण ज्ञान, निर्णयक्षम वृत्ती आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे ते एक कर्तव्यदक्ष, जनतेसाठी तत्पर अधिकारी म्हणून ओळखले जात.

आपल्या कार्यकाळात बाबर यांनी जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतींच्या विविध विकासकामांना गती देत, अनेक प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मिळवून दिली. त्यांची जागा आता जयंत जावडेकर हे अनुभवी प्रशासकीय अधिकारी भरणार असून, त्यांच्याकडूनही विकासाच्या कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3377442
Share This Article