GRAMIN SEARCH BANNER

गणपतीपुळे समुद्रात बुडणाऱ्या सांगलीतील तरुणाला वाचवले

Gramin Varta
177 Views

मोरया वॉटरस्पोर्टच्या जीवरक्षकांचे तत्पर प्रयत्न

रत्नागिरी : तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर बुधवारी (५ ऑक्टोबर) दुपारी घडलेल्या घटनेत खानापूर (ता. विटा, जि. सांगली) येथील एका तरुणाचा जीव वाचवण्यात स्थानिक जीवरक्षकांना यश आले.

शशांक धीरेंद्र कुलकर्णी असे वाचवण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तो आपल्या मित्रांसह गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आला होता. दर्शनानंतर सर्वजण आंघोळीकरिता समुद्रात उतरले असता शशांक खोल पाण्यात अडकून बुडू लागला. मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर किनाऱ्यावर उपस्थित मोरया वॉटरस्पोर्टचे कर्मचारी आणि जीवरक्षकांनी तत्काळ प्रतिसाद दिला.

जेस्की बोटीच्या साहाय्याने त्यांनी पाण्यात उतरत शशांकला सुरक्षित बाहेर आणले. त्यांच्या वेळीच दाखवलेल्या तत्परतेमुळे एक मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर पर्यटकांकडून जीवरक्षकांच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3392568
Share This Article