GRAMIN SEARCH BANNER

पहिल्या मजल्यावरून पडून जखमी झालेल्या गोळप येथील ५६ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
120 Views

रत्नागिरी: तालुक्यातील गोळप येथे एका व्यक्तीचा घरामध्ये झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुनाफ युसुफ मजगांवकर (वय ५६, रा. मुसलमानवाडी, गोळप रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
घरामध्ये पहिल्या मजल्यावरून पडून ते २३ ऑक्टोबर २०२५ रोजी जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असताना २९ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. यासंबंधीची नोंद पूर्णगड पोलिसांत करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3366863
Share This Article