GRAMIN SEARCH BANNER

दापोली : दारूच्या नशेत दुकानात घुसून तोडफोड; दोघांविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
293 Views

दापोली : तालुक्यातील जालगाव चोरगेवाडी येथे दारूच्या नशेतून दुकानात घुसून तोडफोड करत धमकावल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध दापोली अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना ५ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे नऊच्या सुमारास घडली.

या प्रकरणी केतन एम. के. (वय ३५, रा. जालगाव चोरगेवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी राहुल गोपीदास आणि त्याचा साथीदार जायजू (पूर्ण नाव उपलब्ध नाही) हे दोघेही दारूच्या नशेत दुकानात आले. त्यांनी कोणत्याही कारणाशिवाय शिवीगाळ करत दुकानातील साहित्याची तोडफोड केली.

याच दरम्यान राहुल गोपीदास यांनी तक्रारदारास फोनवर अश्लील भाषा वापरत जीवितास धोका होईल अशा धमक्या दिल्याचे नमूद आहे.

तक्रारीच्या आधारे दापोली पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार सपोफी/७२७ गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3368247
Share This Article