GRAMIN SEARCH BANNER

नाचणे ग्रामपंचायतीकडून स्वच्छतेसाठी आणखी एक पाऊल पुढे; सेप्टिक टॅंक उपसणी गाडी उपलब्ध

Gramin Varta
109 Views

नाचणे : नाचणे ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आजपर्यंत गावातील नागरिकांना सेप्टिक टॅंक उपसण्यासाठी नगरपालिकेवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, आता शासनाच्या सहकार्याने ग्रामपंचायतीकडे स्वतःची सेप्टिक टॅंक उपसणी गाडी उपलब्ध झाली असून, त्यामुळे नागरिकांची मोठी समस्या दूर झाली आहे.

याआधीच नाचणे गावात मळापासून खत तयार करण्यासाठीचा राज्यातील पहिला प्रकल्प उभारण्यात आला आहे. हा प्रकल्पही शासनाच्या सहकार्याने साकारला असून, त्याला आता या नव्या सुविधेची जोड मिळाल्याने स्वच्छतेच्या क्षेत्रात नाचणे ग्रामपंचायत एक आदर्श ठरत आहे

Total Visitor Counter

3374604
Share This Article