चिपळूण : जागतिक मधुमेह दिनानिमित्त १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत अपरांत हॉस्पिटल, चिपळूण येथे विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्दिष्ट.. सध्याच्या तणावपूर्ण आणि अव्यवस्थित जीवनशैलीमुळे वाढत चाललेल्या मधुमेह समस्येबाबत जनजागृती निर्माण करणे आणि नागरिकांना योग्य आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हे आहे.
नुकत्याच संपलेल्या गणपती, दसरा आणि दिवाळी सारख्या सणासुदीच्या दिवसांत गोडधोड पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणावर होत असते.
त्यामुळे मधुमेहीं मध्यें शर्करा पातळी अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
अपरांत हॉस्पिटलतर्फे हे शिबिर केवळ नेहमीच्या वैद्यकीय तपासणीपुरते मर्यादित नसून नागरिकांच्या आहार व जीवनशैलीत सुधारणा घडवून आणण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे.
शिबिरात सर्व प्रकारच्या मधुमेह तपासण्या तसेच तज्ञ सर्जिकल कन्सल्टंट व फिजिशियनमार्फत मोफत सल्ला, इ सी जी, फिजिओथेरपी सल्ल्याबरोबरच महिलांसाठी स्त्री सर्जनकडून विशेष सल्ला व मार्गदर्शन दिले जाणार आहे. तसेच आहारतज्ञांकडून योग्य आहार व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शनही करण्यात येणार आहे..
रक्त व लघवी तपासणी, एक्स-रे, सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी या तपासण्यांवर 20 टक्के सवलत देण्यात आली आहे.
अपरांत हॉस्पिटल प्रशासनाने नागरिकांना या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.
संपर्क : 7998898989
7998737373








