GRAMIN SEARCH BANNER

राजापूर : भटाळी परिसरात बिबट्याचा मध्यरात्री वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Gramin Varta
337 Views

तुषार पाचलकर / राजापूर : शनिवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास राजापूर शहरातील समर्थनगर (भटाळी) परिसरात दोन ते तीन वर्षांचा बिबट्या दोन वेगवेगळ्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसल्याने परिसरात प्रचंड घबराट पसरली. मानवी वस्तीत आलेल्या या बिबट्याच्या हालचालींनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाशी संपर्क साधण्यात आला. वनखात्याचे अधिकारी जयराम बावदाणे व विक्रांत कुंभार यांनी रविवारी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती घेतली. येथील वर्धित हालचालींचा अंदाज घेता पिंजरा लावण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रविवारी रात्री भटाळी भागात विशेष पेट्रोलिंग करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सध्या राजापूर शहरासह तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढत असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील विविध भागांत उशीरा रात्री रस्त्यावर फिरणाऱ्या बिबट्याचे दर्शन झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यातच भटाळी परिसरातील नागरी वस्तीत आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या जवळच बिबट्या दिसल्याने भीतीची छाया अजून गडद झाली आहे.

Total Visitor Counter

3376280
Share This Article