GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत
‘आप’चे 6 उमेदवार रिंगणात;नगराध्यक्षपदासाठी भरला अर्ज

Gramin Varta
322 Views

एका दिवसात एकूण 24 उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत रविवारी राजकीय वातावरण अक्षरशः तापले. नगराध्यक्षपदासह एकूण 24 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक कार्यालय परिसरात दिवसभर गजबज पाहायला मिळाली. विशेष म्हणजे, आम आदमी पार्टीने थेट नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करत सर्वांना धक्का दिला असून, अपक्ष उमेदवारांच्या गर्दीमुळेही या निवडणुकीत चुरस वाढली आहे.

महायुतीकडून अद्याप नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर न झाल्याने शहरातील राजकीय चर्चांना ऊत आला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज (१७ नोव्हेंबर) अखेरचा दिवस असल्याने सर्वांचे लक्ष अंतिम क्षणांकडे लागले आहे.

रविवारी उमेदवारीसाठी मोठी गर्दी

सकाळपासूनच रत्नागिरी नगरपरिषद येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात कार्यकर्ते, समर्थक आणि उमेदवारांची मोठी वर्दळ होती. गेल्या काही दिवसांपासून केवळ नगरसेवकपदासाठीच अर्ज दाखल होत होते; मात्र रविवारी ‘आप’ने अचानक नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करत वातावरणात राजकीय धुरळा उडवला.

‘आप’कडून झाडू फिरवण्याची तयारी

आम आदमी पक्षाकडून सुस्मिता सुहास शिंदे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच नगरसेवकपदासाठीही पक्षाकडून सहा उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. त्यात पुढील उमेदवारांचा समावेश आहे.
खलिल नुरुद्दीन वस्ता (प्रभाग 16 ब), रेहाना खलील वस्ता (प्रभाग 16 अ), रमीज इसाक झारी (प्रभाग 1 ब),  तमन्ना करीम खान (प्रभाग 9 ब), रुक्साना लियाकत नावडे (प्रभाग 1 अ), नफिसा मोहम्मद मजगावकर (प्रभाग 4 अ).

रविवारी 7 अपक्ष उमेदवार मैदानात

रविवारी एकाच दिवशी 7 अपक्षांनी आपल्या उमेदवारी अर्जांची नोंदणी केली. त्यात अस्मिता सुशील चवंडे (15 अ), मैथिली देवेंद्र मयेकर (12 अ), अनिकेत अनिल वालम (1 ब), सायमा नदाफ काझी (4 अ), मंजुळा विजय कदम (5 ब), सरिता जितेंद्र कदम (5 ब), कामना अरुण बेग (9 ब) यांचा समावेश आहे.

शिवसेना, भाजप आणि उभाठा गटाचेही अर्ज

शिवसेना (शिंदे) गटाकडून 4 उमेदवारांनी अर्ज दाखल केले :
जागृती राहुल पिलणकर (12 अ), सायली विकास पाटील (9 ब), संतोष विजय कीर (14 ब), नाहिदा तन्वीर सोलकर (8 अ).

भाजपकडून नितीन लक्ष्मण जाधव (1 ब) यांनी नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केला.

तर शिवसेना (उभाठा) गटाने 5 उमेदवारी अर्ज भरले—
पसाद सुरेश सावंत (3 ब), राजश्री बिपीन शिवलकर (15 अ), साजीदखान अकबरखान पावसकर (8 ब), अमित वसंत विलणकर (15 ब), नाझनीन युसुफ हकिम (9 ब).

Total Visitor Counter

3073036
Share This Article