GRAMIN SEARCH BANNER

खालची आळीमध्ये गोवा बनावटीची दारू जप्त; युवकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
205 Views

रत्नागिरी : शहरातील खालची आळी परिसरात गोवा बनावटीची दारू बाळगणाऱ्या युवकावर शहर पोलिसांनी रविवारी संध्याकाळी कारवाई केली. राजू सोमवंशी (23, रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) असे या संशयिताचे नाव असून त्याच्या ताब्यातून 4 हजार 480 रुपयांचे अवैध मद्य जप्त करण्यात आले.

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर करडी नजर ठेवली आहे. 16 नोव्हेंबर रोजी पोलिसांना खालची आळी परिसरात गोवा बनावटीची दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सायंकाळी सुमारे 6 वाजता खालची आळी येथील बंद पडलेल्या बर्प फॅक्टरीलगतच्या परिसरात छापा टाकला.

कारवाईदरम्यान संशयित राजू सोमवंशी हा गोवा बनावटीचे मद्य ताब्यात बाळगून असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3370037
Share This Article