चिपळूण: आबिटगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटलतर्फे राबविण्यात अलेल्या महाआरोग्य सप्ताह ‘डॉक्टर आपल्या गावी’ या मोफत तपासणी शिबिरामध्ये कृषीकन्यांनी सहभाग घेऊन सहकार्य केले.
शिबिरात सुमारे १०० नागरिकांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेतल्या. यानिमित्ताने महिलांसाठी विशेष आरोग्य सल्ला देण्यात आला. शिबिरासाठी विविध तज्ज्ञ डॉक्टर व नर्सिंग कर्मचारी उपस्थित होते. ‘डॉक्टर आपल्या गावी’ या उपक्रमामुळे घराजवळच मोफत तपासणीची सुविधा मिळाल्यामुळे खूप सोयीचे झाले, असे मत गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केले.
शिबिराचे आयोजन मांडकी (ता. चिपळूण) येथील कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचालित चोरगे चॅरिटेबल हॉस्पिटल आणि गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्ष कृषिकन्यांच्या संयुक्त विद्यामाने करण्यात आले होते. यामध्ये अमिषा कोळी, वृषाली गोफणे, दीक्षा खांडेकर, सृष्टी काळे, प्रज्ञा गोठणकर, साक्षी गूरव, साक्षी अवतार, मयुरी ढेकळे, मृणाल उपाध्ये, प्रीती पेरवी या कृषिकन्यांचा सहभाग होता.
चिपळूण : चोरगे हॉस्पिटलच्या ‘डॉक्टर आपल्या गावी’ उपक्रमात कृषिकन्यांचा सहभाग
