GRAMIN SEARCH BANNER

महायुतीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी शिल्पा सुर्वे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Gramin Varta
114 Views

रत्नागिरी/ प्रतिनिधी: रत्नागिरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महायुतीतर्फे नगराध्यक्ष पदासाठी सौ. शिल्पा सुर्वे यांचा अर्ज दाखल केला आहे. अनेक वर्षे रत्नागिरीकरांच्या सेवेत असलेल्या शिल्पा सुर्वे यांना महायुतीने नगराध्यक्ष पदासाठी संधी दिल्यामुळे कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
सौ. शिल्पा सुर्वे यांनी यापूर्वी तीन टर्म महिला आणि बालकल्याण समितीचे सभापती पद निभावले आहे. स्वतःच्या कार्यकाळात त्यांनी नगर परिषदेच्या हद्दीतील शाळांचे पुनरुज्जीवन करण्याचे मोठे काम त्यांनी केले आहे. शिल्पा सुर्वे यांनी आपल्या नगरसेविका पदाच्या कारकीर्दीत महिला सक्षमीकरणावर भर देत प्रभागातील नागरिकांच्या समस्या दूर केल्या आहेत. मा. ना. उदयजी सामंत, आमदार किरण सामंत आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून अनेक योजना राबवून त्यांनी प्रभागातल्या नागरिकांना त्यांचा लाभ मिळवून दिला आहे. शिल्पा सुर्वे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मा. ना. उदयजी सामंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष राहुलजी पंडित, भाजपचे दीपक पटवर्धन, शहर प्रमुख बिपिनजी बंदरकर आणि माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी,स्मितल पावसकर ,राजन शेट्ये ,सचिन वहाळकर,सुदेश मयेकर,विजय खेडेकर,सतीश शेवडे,नाना शिंदे,वर्षा ढेकणे,दादा ढेकणे,राजन पटवर्धन,शेखर लेले शिवसेना भाजपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitor Counter

3366959
Share This Article