GRAMIN SEARCH BANNER

मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे येथे दुचाकीचा अपघात; तरुण जखमी

Gramin Varta
640 Views

सावर्डे: मुंबई-गोवा महामार्गावर सावर्डे नायशी फाटा येथे शनिवारी रात्री घडलेल्या एका अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून, जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रथमेश काणेकर (वय २२, रा. शिवखुर्द, सुतारवाडी, ता. चिपळूण) असे या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश काणेकर हा शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत होता. तो सावर्डे हद्दीतील नायशी फाटा येथे आला असता, त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि दुचाकी रस्त्याच्या बाजूला जाऊन धडकली. या धडकेत प्रथमेश गंभीर जखमी झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी तत्परतेने धाव घेत त्याला मदतीचा हात दिला आणि तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.

या घटनेची माहिती मिळताच सावर्डे पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, जखमी तरुणाच्या नातेवाईकांचा शोध पोलीस घेत आहेत. या अपघाताचा पुढील तपास सावर्डे पोलीस ठाण्याचे हवालदार कोळेकर करत आहेत.

Total Visitor Counter

3366906
Share This Article