GRAMIN SEARCH BANNER

चिपळुणात 23 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Gramin Varta
927 Views

चिपळूण : शहरातील मार्कंडी भागात एका २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना शनिवारी दुपारी समोर आली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मृत तरुणाची ओळख शुभम रवींद्र सावर्डेकर (वय २३) अशी आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेल्या शुभमचा परिसरात शांत आणि अभ्यासू मुलगा म्हणून उल्लेख होत असे. घरातील इतर सदस्य बाहेर असताना त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी पोलिसांनी तातडीने धाव घेतली. शुभमचे वडील रवींद्र सावर्डेकर हे कोकण रेल्वे सेवेत कार्यरत असून कुटुंबावर दुःखाचा पर्वत कोसळला आहे.

शुभमच्या मागे आई-वडील आणि एक बहीण असा परिवार असून या दुर्दैवी प्रसंगाने संपूर्ण मार्कंडीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Total Visitor Counter

3374442
Share This Article