GRAMIN SEARCH BANNER

ट्रेनमधील अलार्म चेन खेचल्याप्रकरणी नेत्यासह 31 जणांना अटक

Gramin Varta
395 Views

रत्नागिरी: कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्या पाटणा–वास्को एक्सप्रेसमध्ये अलार्म चेनचा गैरवापर करून गाडी थांबवणाऱ्या एका स्थानिक नेत्यासह 31 जणांना RPF पथकाने पकडले. ही कारवाई 1 डिसेंबरच्या पहाटे मडगाव–थिवीम दरम्यान करण्यात आली.

रेल्वे सुरक्षा साखळीचा अनधिकृत वापर वाढत असल्याने RPF ने या गाडीस विशेष लक्षात ठेवले होते. तपासणीदरम्यान अलार्म चेन खेचल्याचे निदर्शनास आले आणि गाडी थांबताच काही प्रवासी करमाळी स्थानकाजवळ बाह्य सिग्नलवरच खाली उतरले होते.

या प्रकारात 15 जणांच्या RPF टीमने तत्परतेने कारवाई करत नेत्यासह सर्व 31 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात रेल्वे कायद्याच्या कलम 141, 145 आणि 147 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

ताब्यात घेतल्यानंतर सर्व आरोपींना मडगाव येथील JMFC न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने संबंधित नेत्यावर 1,100 रुपयांचा दंड, तर इतरांवर 600 रुपयांचा दंड आणि TRC ने तीन दिवसांची साधी कैद अशी शिक्षा लागू केली.

Total Visitor Counter

3372201
Share This Article