GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीची कन्या शर्वरी पावसकरला “विश्वासार्ह व नवोन्मेषी वास्तुविशारद” पुरस्कार

Gramin Varta
136 Views

रत्नागिरी : रत्नागिरीची कन्या शर्वरी रमेश पावसकर हिने जिल्ह्याचा मान उंचावत “डिझाइन अँड व्हिजन डी अँड वी २०२५ बांधकाम पर्यावरण नेतृत्व पुरस्कार” या प्रतिष्ठित सोहळ्यात “महाराष्ट्रातील विश्वासार्ह आणि नवोन्मेषी वास्तुविशारद व रचनाकार – २०२५” हा मानाचा बहुमान प्राप्त केला आहे.

या पुरस्कारासाठी देशातील २८ राज्यांतून उमेदवारांची निवड झाली असताना अंतिम फेरीत महाराष्ट्रातील केवळ दोन तज्ज्ञांचा समावेश होता. त्यापैकी शर्वरीची निवड होणे रत्नागिरी जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे.

शर्वरीच्या परिश्रम, सर्जनशीलता, नवकल्पनाशक्ती आणि कामावरील निष्ठेची पावती म्हणून हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले. राज्यभरातील तिच्या कार्याची झालेली दखल या सन्मानामुळे अधिक अधोरेखित झाली आहे.

दोन वेळा नॅशनल अवॉर्ड विजेते आणि दूरदृष्टी असलेले पद्मश्री वास्तुविशारद जी. शंकर यांच्या हस्ते हा पुरस्कार शर्वरीला प्रदान करण्यात आला, हीदेखील एक विशेष बाब ठरली.

शर्वरी पावसकरच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत असून रत्नागिरीत तिच्या कर्तृत्वाची उत्साहात चर्चा सुरू आहे.

Total Visitor Counter

3367959
Share This Article