GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत रिक्षा चालकाची दुचाकीस्वाराला पट्ट्याने मारहाण, गाडी पुढे नेण्यावरून वाद उफाळला

Gramin Varta
611 Views

रत्नागिरी : शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल परिसरात गाडी पुढे नेण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट मारहाणीमध्ये झाले. या घटनेत एका रिक्षा चालकाने दुचाकीस्वारावर पट्ट्याने हल्ला केल्याची घटना ७ डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली.

या मारहाणीत रेहान गणी मुल्ला (वय २८, रा. मच्छी मार्केट, रत्नागिरी) हा युवक जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद महाजन क्रीडा संकुल परिसरात वाहन पुढे नेण्यावरून रिक्षा चालक व दुचाकीस्वार यांच्यात शाब्दिक वाद झाला. वाद वाढत गेल्यानंतर रिक्षा चालकाने आपल्या जवळील पट्ट्याने दुचाकीस्वारावर मारहाण केली. या हल्ल्यात रेहान मुल्ला याला दुखापत झाली.

घटनेनंतर जखमी युवकाने तातडीने उपचार घेतले असून या प्रकरणी रत्नागिरी पोलिस ठाण्यात अनोळखी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करण्यात येत आहे.

शहरात वाहतुकीच्या किरकोळ कारणांवरून होणाऱ्या वादांमुळे अशा घटना घडत असल्याने नागरिकांनी संयम राखावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Total Visitor Counter

3379938
Share This Article