GRAMIN SEARCH BANNER

मुख्यमंत्री सहायता निधीला स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेकडून एक लाख

Gramin Varta
7 Views

रत्नागिरी : राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढदिवसाला शुभेच्छा जाहिरात, बॅनरबाजी न करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने आज एक लाखाचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता धनादेश दिला. याद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज २२ जुलै रोजी वाढदिवस असतो. या दिवशी अनेक जण शुभेच्छापर जाहिरात देतात. बॅनर लावतात. मात्र हा खर्च करण्याऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी, यातून राज्याच्या जनतेला मदत करता येते, असे भावनिक आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते. याला सकारात्मक प्रतिसाद देत स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. पटवर्धन यांनी पतसंस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरिता एक लाख रुपयांचा धनादेश देण्याचे सर्वांच्या सहमतीने ठरवले. त्यानुसार आज जिल्हाधिकारी सिंग यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

याप्रसंगी स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे व्यवस्थापक मोहन बापट आणि सहव्यवस्थापक हेमंत रेडीज उपस्थित होते. या निधीबद्दल जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग व यांनी अॅड. दीपक पटवर्धन यांचे अभिनंदन केले. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची देदीप्यमान वाटचाल आणि सामाजिक दायित्व याबद्दल श्री. सिंग यांनी आनंद व्यक्त केला.
स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था नेहमीच लोकमानसाचा अंदाज घेत नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त उपक्रम राबवत असते. मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलं त्याला प्रतिसाद देत संस्थेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपलं योगदान देऊन महाराष्ट्राचा अत्यंत प्रभावी प्रगल्भ नेतृत्वाचा लोकप्रिय नेतृत्वाचा वाढदिवस साजरा केला.

Total Visitor Counter

2648094
Share This Article