GRAMIN SEARCH BANNER

खेड : हिशोबाच्या वादातून रस्त्यावर अडवून एकाला मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
189 Views

खेड : तालुक्यातील ऐनवरे येथील आर्थिक हिशोबाच्या वादातून एका व्यक्तीस सार्वजनिक रस्त्यावर अडवून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सुनिल बाबुराव जाधव यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, त्यानुसार चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणी सुहास बाबाजी जाधव, पसन्न पांडुरंग जाधव, सुभाष गणपत जाधव व राजेश रामचंद्र जाधव (सर्व रा. ऐनवरे-खालीवाडी) अशी आरोपींची नावे असून, श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या पाठीमागील सार्वजनिक रस्त्यावर तक्रारदाराला अडवून शिवीगाळ करत मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत

Total Visitor Counter

3370255
Share This Article