राजापूर : दिल्ली येथे होणाऱ्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी जिल्ह्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे एकूण २४ प्रतिनिधी शुक्रवारी रवाना झाले.
१३ ते १५ डिसेंबर या कालावधीत दिल्लीतील भारत मंडपम येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव संपन्न होत आहे. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी चिपळूण येथील धर्मप्रेमी भगवान परशुराम देवस्थानचे विश्वस्त ह.भ.प. अभय महाराज सहस्त्रबुद्धे, खेड तालुका वारकरी संघटनेचे सचिव ह.भ.प. गणपत महाराज येसरे, विहिपचे पराग ओक, चोरवणे–उतेकरडी येथील श्री रामवरदायिनी देवस्थानचे प्रवीण सावंत, धर्मप्रेमी जगन्नाथ मोरे, हिंदू जनजागृती समितीचे सुरेश शिंदे हे चिपळूण रेल्वे स्थानकातून रवाना झाले.
तसेच खेड रेल्वे स्थानकावरून खेड तालुका वारकरी संघटनेचे ह.भ.प. गणपत महाराज येसरे, दापोली–जालगाव येथील महालक्ष्मी देवस्थानचे उपाध्यक्ष सुरेश रेवाळे तसेच दापोली येथील धर्मप्रेमी भालचंद्र मुसलोणकर हेही रेल्वेमार्गे दिल्लीतील सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी रवाना झाले.
दिल्लीतील शंखनाद महोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून २४ प्रतिनिधी रवाना






