GRAMIN SEARCH BANNER

इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंटद्वारे मुलीचे आक्षेपार्ह फोटो प्रसारित; संशयितावर गुन्हा

Gramin Varta
259 Views

चिपळूण : इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करून त्याद्वारे एका अनोळखी मुलाचा आक्षेपार्ह फोटो अपलोड करून तो प्रसारित केल्याप्रकरणी एका संशयिताविरोधात गुरुवारी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची फिर्याद विनोद सहदेव आंबेरकर यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २३ डिसेंबर २०२२ रोजी घडला. संशयित व्यक्तीने इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून त्यामार्फत एका अनोळखी मुलाचा आक्षेपार्ह फोटो अपलोड केला व तो सोशल मीडियावर प्रसारित केला.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित संशयिताविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3375164
Share This Article