GRAMIN SEARCH BANNER

लांजात भरधाव कारची एक्टिव्हाला जोरदार धडक; आजोबा व नातू जखमी

Gramin Varta
999 Views

लांजा : मुंबई–गोवा महामार्गावर वेरळ येथे भरधाव कारने पाठीमागून धडक दिल्याने एक्टिव्हा दुचाकीवरील आजोबा व नातू जखमी झाल्याची घटना शनिवार, १३ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

याप्रकरणी पांडुरंग महादेव सुर्वे (वय ६५, रा. कुवे मराठवाडी, ता. लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे भाऊ विठोबा महादेव सुर्वे (वय ६९) हे आपल्या ताब्यातील एमएच ०८ एएफ १६४९ क्रमांकाच्या एक्टिव्हावरून रत्नागिरीच्या दिशेने जात होते. त्यांच्या दुचाकीवर नातू प्रसन्न विशाल सुर्वे (वय १३) हा बसला होता.

वेरळ येथील हॉटेल प्रीतम प्रसाद समोर आले असता मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आय-२० कारने (एमएच ०५ सीएम ७९६२) त्यांच्या एक्टिव्हाला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही कार श्रीहरी गिरीजन नायर (वय २३, रा. अंबरनाथ, ठाणे) चालवत होता.

या धडकेत विठोबा सुर्वे व त्यांचा नातू प्रसन्न सुर्वे हे दोघेही जखमी झाले. जखमींना तातडीने लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी कारचालक श्रीहरी नायर याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे करत आहेत.

Total Visitor Counter

3200111
Share This Article