GRAMIN SEARCH BANNER

वांझोळे येथे श्री महालक्ष्मी मंदिर वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

Gramin Varta
286 Views

देवरुख: देवगिरी देवरुख सामाजिक संस्थेच्या वतीने वांझोळे कुड्याचा माच येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या सातव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवार, १६ डिसेंबर २०२५ रोजी भव्य मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाले. या शिबिराला वांझोळे गाव आणि परिसरातील पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

या सामाजिक उपक्रमासाठी देवरुख येथील एस. एम. एस. हॉस्पिटल आणि साखरपा ग्रामीण रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे मोलाचे सहकार्य लाभले. आरोग्य तपासणी पथकामध्ये साखरपा ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रसाद पाटील, डॉ. अंकिता माने, आरोग्यसेवक संभाजी साजणे, आरोग्यसेविका शिर्के मॅडम, लॅब टेक्निशियन शेडे मॅडम, आशासेविका स्नेहल नाईक आणि मदतनीस प्रमिला चव्हाण यांचा समावेश होता. तसेच एस. एम. एस. हॉस्पिटलचे एम. डी. डॉक्टर दिडगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही रुग्णांची सखोल तपासणी करून वैद्यकीय सल्ला दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी देवगिरी देवरुख सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश अनंत घाडगे यांच्यासह संस्थेचे सदस्य सतिश भोपळे, चेतन नाईक, अमित नाईक आणि गोपीचंद नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरासाठी संदिप रामचंद्र शिवगण, मनोज रामचंद्र शिवगण आणि कुड्याचा माच वाडीतील सर्व कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अध्यात्मिक उत्सवासोबतच सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

Total Visitor Counter

3387165
Share This Article