GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघाला जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद

Gramin Varta
204 Views

संगमेश्वर: जिल्हा परिषद, रत्नागिरी शिक्षण विभाग व शासकीय अध्यापक महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शिक्षक–शिक्षकेतर क्रीडा स्पर्धेत संगमेश्वर तालुका शिक्षकेतर संघाने अंतिम सामन्यात दणदणीत विजय मिळवत विजेतेपदावर आपले नाव कोरले. हा अंतिम सामना रत्नागिरी येथील प्रमोद महाजन स्टेडियमवर खेळविण्यात आला होता. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच संगमेश्वर संघाने आक्रमक, शिस्तबद्ध व संघभावनेचा खेळ दाखवत सलग सामने जिंकले आणि अंतिम फेरीत प्रवेश करून विजेतेपद पटकावले.

संगमेश्वर संघाच्या खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत वैयक्तिक उल्लेखनीय कामगिरी करून प्रत्येक सामन्यात विशेष योगदान दिले. यामध्ये रणजीत पवार ६८ धावा व ८ बळी, सचिन सुर्वे ३१ धावा व ४ बळी, सुयोग बांडागळे ५२ धावा, ३ बळी व ५ झेल, संतोष गवंडी ३ बळी व २ झेल, सुनील जाधव ३ बळी व १ झेल, मंगेश जाधव १ झेल, दीपक चव्हाण १ बळी, याचबरोबर मनोज जाधव यांनी यष्टीरक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी करून संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी केली. संघाच्या यशामागे व्यवस्थापक  विशाल जाधव(सोनवडे हायस्कूल) यांचे योग्य नियोजन, मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.

संगमेश्वर तालुका क्रिकेट संघात सचिन सुर्वे(कुंभारखणी हायस्कुल), रणजित पवार(आंगवली हायस्कूल), सुयोग बांडागळे(पाद्ये स्कुल, देवरुख),  सुहास लोंढे (किरबेट हायस्कूल),  सुनिल जाधव(कोसुंब हायस्कूल),  मंगेश जाधव(बुरंबी हायस्कूल),
संतोष गवंडी(देवरूख हायस्कूल), मनोज जाधव(पैसाफंड हायस्कूल), अजय गजबार(देवरूख हायस्कुल), अनंत जाधव(पैसाफंड हायस्कूल), दिपक चव्हाण व प्रदीप करंडे(दोघे ताम्हाणे हायस्कूल) यांचा समावेश होता. संघाने मिळविलेल्या यशासाठी विविध मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. विजेतेपद मिळवणाऱ्या संगमेश्वर तालुका संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3227908
Share This Article