GRAMIN SEARCH BANNER

रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
444 Views

खेड : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेतून पडून २५ ते ३० वयोगटातील एका अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भोस्ते रेल्वे पुलालगत गस्त घालणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास मृतदेह आढळून आला.

या तरुणाला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3366849
Share This Article