GRAMIN SEARCH BANNER

धनशक्तीवर जनशक्तीचा विजय; राजापूरकरांनी दडपशाहीला दिले चोख उत्तर : नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे

Gramin Varta
291 Views

राजापूर : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत समस्त राजापूरवासीयांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला नगराध्यक्षा म्हणून निवडून दिले आहे. हा विजय केवळ माझा नसून संपूर्ण राजापूरवासीयांचा विजय आहे. जनतेने माझ्यावर व माझ्या सहकाऱ्यांवर दाखवलेला विश्वास नक्कीच सार्थ करून दाखवू, असे आश्वासन नवनिर्वाचित नगराध्यक्षा हुस्नबानू खलिफे यांनी दिले.
राजापूरची जनता नेहमीच विकासाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे, हे या निकालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हा विजय म्हणजे धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा विजय असून, हा निकाल म्हणजे दडपशाही आणि दहशतीला राजापूरकरांनी दिलेले चोख उत्तर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी सर्व राजापूरवासीयांचे आभार मानले.

Total Visitor Counter

3366867
Share This Article