GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : उक्ताड येथील 29 वर्षीय विवाहितेचा शस्त्रक्रियेनंतर मृत्यू

Gramin Varta
429 Views

चिपळूण: शहरातील उकताड कणसेवाडी येथील एका २९ वर्षीय विवाहितेचा पनवेल येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अवनी अविनाश किजबिले असे मृत विवाहितेचे नाव आहे. उपचारादरम्यान १४ डिसेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवनी किजबिले यांच्यावर काही दिवसांपूर्वी डेरवण येथील रुग्णालयात अपत्यप्राप्तीसंदर्भात एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा झाली नाही. त्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना नवी मुंबईतील वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाही प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना १३ डिसेंबर २०२५ रोजी कामोठे, पनवेल येथील एम.जी.एम. रुग्णालयात हलविण्यात आले होते.

दुर्दैवाने, एम.जी.एम. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच दुसऱ्या दिवशी, म्हणजेच १४ डिसेंबर रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची रीतसर नोंद सुरुवातीला कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर हा गुन्हा वर्ग होऊन १९ डिसेंबर रोजी टपालाद्वारे चिपळूण पोलीस ठाण्यात प्राप्त झाला. त्यानुसार २२ डिसेंबर रोजी चिपळूण पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3367004
Share This Article