GRAMIN SEARCH BANNER

खेड : बस थांब्यावर उभ्या असलेल्या प्रौढाला धडक दिल्याप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा

खेड : खेड–दापोली मार्गावरील साखरोली गावातील बसथांब्याजवळ झालेल्या अपघातप्रकरणी दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपेंद्र रामाशंकर पासवान (वय ३३, रा. घाणेखुंट) असे गुन्हा दाखल झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

या अपघातात जयराम गंगाराम पाटील (वय ५५, रा. साखरोली–मधलीवाडी) हे जखमी झाले आहेत. उपेंद्र पासवान हा आपल्या ताब्यातील दुचाकी (क्र. एम.एच. ०८ ए.वाय. १६७६) घेऊन जात असताना बसथांब्यावर उभ्या असलेल्या पाटील यांना जोराची धडक बसली. या धडकेत पाटील यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3483460
Share This Article