GRAMIN SEARCH BANNER

उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याने विवाहितेचा मृत्यू

Gramin Varta
159 Views

चिपळूण : उंदीर मारण्याचे औषध प्राशन केल्याने एका विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी अलोरे–शिरगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जयश्री विजय मोहिते (वय 27, रा. आकले) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबतची खबर पती विजय भगवान मोहिते यांनी पोलिसांना दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय व जयश्री मोहिते यांचा विवाह 2017 साली झाला होता. मुल होत नसल्याच्या कारणामुळे जयश्री मानसिक तणावाखाली असल्याचे समजते. 24 रोजी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास त्यांनी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. त्यानंतर त्यांना तातडीने दादर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
प्रकृती गंभीर झाल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना डेरवण येथील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच 25 रोजी सकाळी 9.46 वाजता जयश्री मोहिते यांचे निधन झाले. या घटनेचा पुढील तपास अलोरे–शिरगाव पोलीस करीत आहेत.

Total Visitor Counter

3367463
Share This Article