GRAMIN SEARCH BANNER

देवरुखच्या सौंदर्यात भर; छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराच्या सुशोभीकरण कामाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते भूमिपूजन

Gramin Varta
222 Views

देवरुख: देवरुख नगरपंचायत क्षेत्रातील मध्यवर्ती आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक पाराच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचा संकल्प आता प्रत्यक्षात येत आहे. या महत्त्वपूर्ण कामाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झाले. देवरुख शहराच्या वैभवात भर घालणारे हे काम व्हावे, यासाठी आमदार निकम यांनी विशेष पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेतला होता. त्यांच्या या दूरदृष्टीमुळे शहराच्या मुख्य चौकाचा कायापालट होणार असून, विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा आपली कार्यतत्परता सिद्ध केली आहे.

विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला पक्षभेद विसरून सर्वपक्षीय नवनिर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजकारणापेक्षा शहराचा विकास आणि लोकहित महत्त्वाचे असते, याचा प्रत्यय या सोहळ्याच्या निमित्ताने देवरुखवासीयांना आला. आमदार शेखर निकम यांनी नेहमीच सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका घेतल्याने, या कार्यक्रमात एकोप्याचे दर्शन घडले. ‘आपले-परके’ असा कोणताही भेदभाव न करता, मतदारसंघातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवणे हेच आपले ध्येय असल्याचे यावेळी आमदार निकम यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळेच सर्वसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना असल्याचे दिसून येते.

या प्रसंगी नवनिर्वाचित नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, नगरसेविका प्राची भुवड, नगरसेवक यशवंत गोपाळ, दिपक खेडेकर, अक्षय झेपले, अनुराग कोचिरकर, निधी कापडी, रिया कदम, बाळा कामेरकर, हनिफ शेठ हरचिरकार, वामनराव मोडक, बाळू ढवळे, पंकज पुसाळकर, प्रफुल्ल भुवड, नितिन भोसले, धनसूख पटेल, हरेश पटेल, सागर संसारे, रवींद्र लाड, बाळू वनकर, बाळा पंदेरे, रामू पंदेरे, मंगेश बांडागळे, दिनेश बांडागळे, प्रतीक वनकर, गिरीश भोंदे, पाताडे, मकरंद नलावडे, राजू जागुष्टे, नंदू देसाई, बबन चव्हाण, विनित बेर्डे, इस्तियाक कापडी यांसह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि देवरुखमधील ग्रामस्थ उपस्थित होते. देवरुखच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असणाऱ्या आमदार शेखर निकम यांच्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3369368
Share This Article