GRAMIN SEARCH BANNER

खेडमध्ये कारच्या धडकेत देवस्थान पुजाऱ्याचा मृत्यू

Gramin Varta
262 Views

खेड : तालुक्यातील कळंबणी बुद्रुक येथील श्री भैरी बालकोबा देवस्थानाचे पुजारी रामचंद्र बाबू गुरव (वय ५८, रा. कळंबणी बुद्रुक) यांचा शनिवारी पहाटे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. इर्टिगा कारने पाठीमागून दिलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते.

रामचंद्र गुरव हे दुचाकीवरून कळंबणीहून भरणा दिशेने जात असताना नवी मुंबई येथील आस्वाद सुभाष बल्लाळ यांच्या ताब्यातील इर्टिगा कारने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी प्रयत्न सुरू असतानाच पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

Total Visitor Counter

3199338
Share This Article