GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये एसटी बसची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी, बसचालकावर गुन्हा

Gramin Varta
155 Views

चिपळूण : तालुक्यातील मालघर परिसरात २ जानेवारी रोजी भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने विरुद्ध बाजूने येत दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून संबंधित एसटी बसचालकाविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अमोल मोहन कांबळे (वय ३५, गुहागर डेपो) या एसटी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात विठ्ठल वसंत पंदेरे (वय ४०, रा. कापसाळ) हे जखमी झाले आहेत. याबाबतची फिर्याद रवींद्र झिमा माटे (वय ३५, गुहागर डेपो) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल पंदेरे हे त्यांच्या ताब्यातील दुचाकीवरून रामपूर येथून चिपळूणच्या दिशेने गुहागर–चिपळूण मार्गावरून प्रवास करत होते. दरम्यान, मालघर–महाडिकवाडी येथील पुढील वळणावर चिपळूणकडून येणाऱ्या एसटी बसचा चालक अमोल कांबळे याचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे बस विरुद्ध बाजूला गेली आणि दुचाकीला जोरदार धडक बसली.
या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3206303
Share This Article