GRAMIN SEARCH BANNER

पावस परिसरात संशयास्पद मृत्यू; रुग्णालयात उपचारादरम्यान प्रौढाचा अंत

Gramin Varta
130 Views

रत्नागिरी : तालुक्यातील नाखरे-मुंगणेकरवाडी येथील एका ५७ वर्षीय प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुर्यकांत विनायक मुंगणेकर (वय ५७, रा. नाखरे-मुंगणेकरवाडी, रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १) सकाळी सुर्यकांत मुंगणेकर हे आपल्या निवासस्थानी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी तातडीने त्यांना पावस येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

जिल्हा रुग्णालयात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उपचार सुरू असतानाच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. सुर्यकांत यांना मद्यपानाची सवय असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Total Visitor Counter

3199272
Share This Article