GRAMIN SEARCH BANNER

लाडकी बहीण योजना मी असेपर्यंत बंद होणार नाही – मुख्यमंत्री

Gramin Varta
189 Views

अकोला : महानगरपालिकेत भाजपचे 60 हून अधिक उमेदवार निवडून येतील, याबाबत आपल्याला कोणतीही शंका नसल्याचा विश्वास व्यक्त केला. विरोधकांकडून ‘लाडकी बहीण योजना बंद होणार’ अशी अफवा पसरवली जात असल्याचा आरोप करत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ही योजना सुरूच राहणार असून जोपर्यंत “तुमचा देव भाऊ आहे, तोपर्यंत ही योजना बंद होणार नाही,अशी ग्वाहीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

अकोला महानगरपालिकेतील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य सभा अकोल्यात आयोजित करण्यात आली होती. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून राज्य व अकोला शहरासाठी करण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी अकोलेकरांना विविध विकासात्मक आश्वासनंही दिली.

यावेळी त्यांनी अकोला महानगरपालिका पुन्हा भाजपच्या हाती देण्याचे आवाहन नागरिकांना केले,अन्य पक्ष सत्तेत आले तर विकासनिधीचा योग्य वापर होणार नाही, असा आरोप करत भाजपलाच संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. अकोला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच अकोल्याला एक आधुनिक शहर बनवण्याचे वचनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणातून दिले.

तर २०१७ मध्ये अकोला महापालिकेची सत्ता भाजपकडे दिली होती. शहरात मोठ्या प्रमाणात कामे केली. हद्दवाढीनंतर विकास आराखडा तयार करून विकास कामे केली. महापालिकेच्या माध्यमातून विकास कामे पूर्णत्वाला गेली. हद्दवाढ क्षेत्रापर्यंत पाणी पुरवठा केला. वाढीव पाणीपुरवठा योजना २२१ कोटींची केली असून त्याचे काम सुरू केले.५२१ कोटींचा आणखी एक टप्पा हाती घेतला जाणार आहे. भूमीगत गटार योजनेचे काम सुरू आहे. जलशुद्धीकरणाचे प्रकल्प हाती घेण्यात आले. सीसीटीव्हीचा प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे. न्यू तापडिया नगरच्या उड्डाणपुलासाठी ३७कोटींचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. महापालिकेची नवीन इमारत तयार केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सभेचे सूत्रसंचालन गिरीश जोशी आणि सिद्धार्थ शर्मा यांनी केले, तर आभार जयंत मसने यांनी मानले. सभेसाठी मोठी गर्दी उसळली होती.

Total Visitor Counter

3366863
Share This Article