GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण नगर परिषदेत ७७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

Gramin Varta
85 Views

शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेत आज सकाळी नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून भारताचा ७७वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, मुख्याधिकारी संजय जाधव यांच्यासह सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

चिपळूण नगर परिषदेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षात शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष म्हणून उमेशदादा सकपाळ यांना ध्वजारोहणाचा मान मिळाला, ही बाब यावेळी विशेष ठरली.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेसहा वाजता बहादुरशेख नाका येथील भारताचे संविधानकर्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नगराध्यक्ष उमेशदादा सकपाळ यांनी अभिवादन करून केली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

यानंतर इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राशेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. येथेही फटाक्यांच्या आतषबाजीत वातावरण देशभक्तीमय झाले.नगर परिषद आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नगराध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर जिलेबी वाटप करून प्रजासत्ताक दिनाचा आनंद साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला उपमुख्याधिकारी मंगेश पेढांबकर, पाणीपुरवठा समितीचे सभापती निहार कोवळे, बांधकाम सभापती कपिल शिर्के, आरोग्य सभापती शुभम पिसे, शिक्षण सभापती हर्षाली पवार, सौ. आरती सकपाळ व सकपाळ कुटुंबीय, सर्व विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बापू साडविलकर यांनी केले.

Total Visitor Counter

3198463
Share This Article