GRAMIN SEARCH BANNER

जयगड–नांदिवडे रस्त्यावर गांजासह संशयित अटकेत ; २३ हजारांचा अमली पदार्थ जप्त

Gramin Varta
523 Views

रत्नागिरी : तालुक्यातील जयगड ते नांदिवडे या रस्त्यालगत असलेल्या जेएसडब्ल्यू लेबर कॉलनीच्या कंपाऊंडजवळ गांजा हा अमली पदार्थ बाळगणाऱ्या संशयितावर जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंटु कुमार राम मिस्त्री (रा. जेएसडब्ल्यू लेबर कॉलनी, नांदिवडे, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे.
संशयिताच्या ताब्यातून पोलिसांनी सुमारे २३ हजार रुपये किमतीचा ७८४ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. जयगड–नांदिवडे परिसरात अमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती जयगड पोलिसांना मिळाल्यानंतर या ठिकाणी सापळा रचण्यात आला होता. त्यानुसार १३ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ९ वाजता जेएसडब्ल्यू लेबर कॉलनी परिसरात संशयित आरोपी गांजा बाळगताना आढळून आला.

या प्रकरणी संशयिताविरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अंतर्गत कलम ८(क) व २०(ब)(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास जयगड पोलीस करीत आहेत.

Total Visitor Counter

3253144
Share This Article