GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण: शिमगा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीदेवी करंजेश्वरी शेरणी काढण्याच्या जागेची नगराध्यक्ष यांच्याकडून पाहणी

Gramin Varta
75 Views

चिपळूण : चिपळूण शहरात लवकरच शिमगा उत्सवांना सुरुवात होणार असून गोवळकोट येथील श्रीदेवी करंजेश्वरी देवीच्या शेरणी काढण्याच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाटण येथे सुरू असलेल्या कामांची नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी पाहणी केली. शेरणी काढण्याचा कार्यक्रम सुरळीत व सुरक्षित पार पडावा, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

श्रीदेवी करंजेश्वरी देवीचा शेरणी काढण्याचा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून दरवर्षी हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित राहतात. भाटण परिसरात भरतीचे व साचलेल्या पाण्यामुळे शेरणी काढण्याच्या कार्यक्रमात अडथळे निर्माण होत असल्याने या ठिकाणी जलसंपदा विभाग व चिपळूण नगरपालिकेच्या माध्यमातून आवश्यक कामे सुरू आहेत. या कामांची प्रत्यक्ष पाहणी नगराध्यक्षांनी केली.

यावेळी उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर, आरोग्य सभापती शुभम पिसे, बांधकाम सभापती कपिल शिर्के, उदय जुवळे, नगरसेवक प्रमोद बुरटे, विकी लवेकर, श्रीदेवी करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष ॲड. प्रसाद चिपळूणकर, सामाजिक कार्यकर्ते साईनाथ कपडेकर, कट्ट्या देवळेकर, यतीन दांडेकर तसेच नगर परिषदेचे अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी श्रीदेवी करंजेश्वरीचा शेरणी काढण्याचा कार्यक्रम विना विघ्न व सुरक्षितपणे पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला.

Total Visitor Counter

3342897
Share This Article