GRAMIN SEARCH BANNER

शिवनेरी किल्ल्यावर चेंगराचेंगरी, अनेक जण जखमी

Gramin Varta
160 Views

जुन्नर: देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी होत असतानाच छत्रपतींचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर चेंगराचेंगरीची घटना घडली. शिवजयंतीच्या निमित्ताने मध्यरात्री किल्ल्यावर मोठी गर्दी झाली होती.

यावेळी चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झालेत. यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

यासंदर्भातील माहितीनुसार, शिवजयंती सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून शिवभक्त कालपासूनच शिवनेरी किल्ला येथे दाखल झाले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अंबरखान्याखालील हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. अरुंद वाटेवर हजारो नागरिक एकाच वेळी जमा झाल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. गर्दीचा ताण वाढल्याने तेथे तैनात असलेली पोलीस यंत्रणाही अपुरी पडली आणि अचानक चेंगराचेंगरी झाली. काही क्षणातच परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रेटारेटीमुळे अनेकजण एकमेकांवर पडले व काहीजण किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून, सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, प्रशासनाकडून घटनास्थळी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पुढील कार्यक्रम शांततेत पार पडावेत यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.

Total Visitor Counter

3262010
Share This Article