GRAMIN SEARCH BANNER

कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेसला कायमस्वरूपी जादा डबे

रत्नागिरी: कोकण रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेसला आता कायमस्वरूपी अतिरिक्त डबे जोडले जाणार आहेत.यामुळे प्रवाशांना अधिक जागा उपलब्ध होऊन प्रवास सुखकर होण्यास मदत होईल.

कोकण रेल्वेने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, या दोन्ही गाड्यांची डब्यांची संख्या आता २२ वरून २३ करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने ३ टायर एसी (इकॉनॉमी) श्रेणीचा एक अतिरिक्त डबा वाढवण्यात आला आहे.उन्हाळी सुट्ट्या आणि सणासुदीच्या काळात कोकणात येणाऱ्या गाड्यांना प्रचंड गर्दी असते. एसी इकॉनॉमी डबा वाढल्यामुळे मध्यमवर्गीय प्रवाशांना कमी दरात वातानुकूलित प्रवासाची अधिक संधी मिळणार आहे.

Total Visitor Counter

3485368
Share This Article