GRAMIN SEARCH BANNER

मंडणगड पंचायत समितीच्या सभापतीपदी प्रणाली चिले, तर उपसभापतीपदी दीपक मालुसरे बिनविरोध

मंडणगड : निवडणूक निर्णय अधिकारी विरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत प्रणाली चिले, तर उपसभापतीपदी दीपक मालुसरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सकाळी ११ वाजता नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली. दुपारी ३ वाजता पंचायत समितीच्या सभागृहात निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी सुनील खरात, महसूल मंडळ अधिकारी निलेश गोडघासे, वामन मेंढे तसेच पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते. दाखल झालेली दोन्ही नामनिर्देशनपत्रे वैध ठरल्याने माघार घेण्याचा कालावधी संपल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी विरसिंग वसावे यांनी सभापतीपदी प्रणाली चिले व उपसभापतीपदी दीपक मालुसरे यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर दोघांनाही निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले.निवड जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांनी सभागृहात जाऊन आपल्या खुर्चीवर स्थानापन्न होत पदभार स्वीकारला. यावेळी माजी सभापती आदेश केणे, अनंत लाखण, रामदास रेवाळे, संदेश चिले, जिल्हा परिषद सदस्या अस्मिता केंद्रे, प्रताप घोसाळकर, विभागप्रमुख इरफान बुरोंडकर, जितेंद्र दवंडे, संजय शेडगे यांच्यासह तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, युवासैनिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या तसेच विविध खात्यांचे अधिकारी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Total Visitor Counter

3486895
Share This Article