GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; आठ विद्यार्थ्यांच्या मनमानी विरोधात तक्रार

Gramin Varta
439 Views

रत्नागिरी : रत्नागिरी येथील लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना रॅगिंगचा मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. केवळ ‘कॉमन ऑफ’ घेण्यासाठी त्याच विभागातील अन्य आठ विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या तीन विद्यार्थ्यांचे रॅगिंग केल्याचा प्रकार घडला आहे. हे आठ विद्यार्थी पीडित विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देऊन त्यांच्यावर दबाव टाकत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

या आठही विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या निदर्शनास ही बाब आणून देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत वारंवार वादविवाद, शिवीगाळ आणि धमक्या देण्याचे सत्र सुरू ठेवल्याने अखेर पीडित विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या मनमानी आणि रॅगिंगच्या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून रत्नागिरी शहर पोलिसांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. मात्र, या प्रकरणा संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.

Total Visitor Counter

3369379
Share This Article